स्वर्गिय कुमुद केसरीनाथ रावते
जन्म
—
१६ मे १९४२
मृत्यु २७ एप्रिल, १९६७ संकष्ट चतुर्थी
कुमुद केसरीनाथ रावते हे कुमुद विद्यामंदिर मधील कुमुदचे पूर्ण नाव माझी मोठी बहिण. आमचे वडील केसरीनाथ शांताराम रावते हे स्वतःचा संसार सांभाळून थोडे फार समाजकार्य करणारे चेंबूरमधील एक जुने ग्रामस्थ चेंबूर हायस्कुलच्या चेंबर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, चेंबूरमधील सर्वात जुने ग्रंथालय लोकमान्य टिळक लायब्ररीच्या संस्थापकांपैकी एक. माझी बहि वडीलांप्रमाणे अत्यंत धार्मिक स्वतःचे शिक्षण घेत असताना इतरांना चांगले शिक्षण देणारी शाळा कशी असावी असे विचार, अशा आमच्या चर्चा चालू असतानाच कुमुदचे अल्पशा आजाराने ऐन तारुण्यात निधन झाले. परंतु तिची पुण्याई इतकी थोर की तिच्या मनातील शाळा कुमुद विद्यामंदिर च्या रुपाने साकार करविण्याचे ठरविल्यानंतर २७ एप्रिल, १९६७ ते १६ मे १९६७या काळात आमचे मोठे मेहुणे श्री. पी. एस. नाईक यांनी संस्थेची घटना स्वतः तयार केली व १६ मे १९६७ रोजी ती कुमुद मेमोरियर फंड या नावाने अस्तित्वात आली. संस्थेचे संस्थापक विश्वस्त पुढील प्रमाणेः
१) श्री. पी. एस. नाईक
२) कु. मीना केसरीनाथ रावते (श्रीम. मीना शरद पाटील)
३) श्री. शरद केसरीनाथ रावते
४) श्री. शरद नारायण पाटील
या पैकी श्री. शरद नारायण पाटील म्हणजेच श्री. पाटील यांना | नविन शाळा उभारणीचा दांगडा अनुभव होता. चेंबूर ते टॉम्बे पर्यंतच्या भागातील काही समाजसेवी नागरिक, पालक परिचयाचे होते. किंबहुना पूर्वीच्या शाळेतील अनुभवामुळे उत्तम शिक्षकी गुणांमुळे तसेच | स्भावामुळे ते लोकप्रियही होते.
श्रीम. मीना शरद पाटील
पूर्वाश्रमी कु. मीना केसरीनाथ रावते (अध्यक्ष) कुमुद मेमोरियल फंड.