Kumud Vidya Mandir

आम्ही ह्यांचे ऋणी आहोत

मे १९६७ मध्ये शाळा काढण्याचा संकल्प केला आणि जून १९६८ मध्ये तो मकुमुद विद्या मंदिर मानखुर्द येथे सुरू करून सिद्धीस नेला, तेव्हा चौतीस वर्षापूर्वी गोवंडी ते ट्रॉम्बे पर्यंतच्या परिसरात एकही हायस्कूल नव्हते. त्यावेळचे गोवंडी इंग्लिश स्कूल कुमुद पेक्षा थोडे आधीचे. चौतीस वर्षाच्या अवधीत मानखुर्दच्या रमणीय परिसर असलेल्या स्वरूपाचे शाळेत रूपांतर झाले. अन त्याचेही आज देवनार येथे स्वतः च्या मालकीच्या जागेत कायम स्वरूपी प्रशस्त मकुमुद विद्यामंदिरफ साकारले ते सहजासहजी नव्हे. या शाळेच्या वास्तूवर अनेकांच्या ऋणनिर्देशाचे शिलालेख कोरावे लागतील. तसा तर हा मजगन्नाथाचाच रथफ आहे ज्याला असंख्याचे हात लागलेले आहेत. त्यातील काही ठळक व्यक्तींच्या शाळेवरील ऋणांचा संक्षिप्त आढावा घेणे प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.
आमच्या कुमुद मेमोरिअल फंड संस्थेची स्थापना, शाळा उभारणीची प्रेरणा, बुद्धिमत्ता, नियोजन, कर्तृत्व हे सारे श्रीयुत पाटील सरांचे. परंतु प्रारंभी एक रोख रक्कम एक रकमी स्वरूपात उपलब्ध करून देणारे रावते कुटुंबीय यांना विसरता येणार नाही. श्री. पी. एस. नाईक, शरद रावते या मूळ विश्वस्तांचे सहकार्य व शुभेच्छा आजही संस्थेच्या पाठीशी आहेत. स्व. वसंत शंकर सावंत उर्फ दादा, स्व. श्रीमती द्विवेदी या आज हयात नसणाऱ्या विश्वस्तांचे योगदानही स्मरणीय आहे. आमचे इतर विश्वस्त सौ. गीता पंडित, डॉ. ठाकूर, श्री. विलास कांबळे हे आदर्श विश्वस्त आहेत. घटनेतील तरतुदीनुसार विश्वस्त संख्या पाच आहे. परंतु कामाचा व्याप खूपच वाढल्यामुळे नवीन विश्वस्त सामावून घेणे आवश्यक होते. सौ. शैलजा टिपणीस कुमुद विद्यामंदिराच्या स्थापना दिनापासून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी अत्यंत आत्मीयतेने व उत्साहाने पार पाडीत आहेत. साहजिक त्यांना निमंत्रित विश्वस्त म्हणून सामावून घेतले व याच शाळेत शिकून पुढे बीएस.सी., बी.एड्., पदवी प्राप्त करून याच शाळेत सहा. शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वंदना राऊत उतखेडे ह्यांनाही निमंत्रित विश्वस्त म्हणून सामावून घेण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व प्रसंगी – कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात एक दिलाने झटणारे असे विश्वस्त क्वचितच सापडतील. आमच्या शालासमितीच्या सर्व सभा शैक्षणिक वातावरणात, मार्गदर्शनपर व अतिशय मोकळया वातावरणात शालासंहिता नियमाधीन राहून होतात. संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना, दंतवैज्ञ असणारे आमचे डॉ. सुहास ठाकूर विनामूल्य वैद्यकीय सेवा देतात. श्री. पाटील सरांचा सल्ला, मार्गदर्शन श्री. विलास कांबळे आमच्या शिक्षकांना या कार्यक्रमांचा, उद्बोधनाचा जो लाभ मिळाला त्याबद्दल कौमुदी न्यासच्या स्थापनेतील पाटील सरांची कल्पकता व शिक्षकांकरिता वैविध्यपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांच्या आयोजनामागील त्यांची तळमळ व कौशल्य याबद्दल शाळेतील शिक्षक त्यांचे सदैव ऋणीच राहतील.
स्त्री मुक्ती संघटना यांच्या अध्यक्षा व ‘मुलगी झाली हो’ प्रसिद्ध ज्योती म्हापसेकर यांनी शाळेचे आवारात दोन वर्षे गरजू स्त्रियांसाठी सल्ला केंद्र चालविले व पालकांच्या उद्बोधनाकरिता मुलगी झाली हो व हुंडा नको ग बाई चे मोफत नाटयप्रवेश सादर केले.
तसेच ‘“जिज्ञासा’’ उपयक्रमातून अनेक वर्षे नववीतील मुलांमुलीकरिता उद्बोधन शिबिरे आयोजित केली त्याची आठवण आम्ही ठेवणार आहोत.
श्री बल्लाळ चंद्रचूड शाळेजवळील दत्तगुरू कॉलनीतील एक दानशूर नागरिक श्री बल्लाळ चंद्रचूड यांनी रोटरी क्लब ऑफ देवनार च्या माध्यम तून तसेच स्वतःच्या स्वर्गीय बडीलांच्या स्मरणार्थ रू.१०,०००/- किंमतीचे जलशुद्धीकरण यंत्र शाळेस देणगी दाखल दिले आहे. रोटरी क्लब ऑफ देवनारच्या इतर क्रियाशील सदस्यांनी देखील शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन कलेले आहे. या सर्व उपक्रमांचा शाळेत प्रारंभ करणारे श्री जयंत राजे यांची यावेळी आठवण होते. इनरव्हील क्लब ऑफ देवनार च्या सदस्यांनी अनेक उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यासाठी डॉ. मृदुला पंडित यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांची, वैद्यकीय सेवेची तसेच सौ. वसुधा चंद्रचूड यांनी मुलांसाठी आयोजित केलेले नेत्रचिकित्साशिबीर, बालदिनाच्या दिवशी आयोजित केलेली वेषभूषा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे यां साऱ्याची नोंद शाळेच्या इतिहासात करावी लागेल.

देणगीदार –
संस्थेला इमारतीकरिता अनेकानी देणग्या दिलेल्या आहेत पण येथे फक्त माध्यमिक विभागाकरिता ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान झाले आहे अशांचा ऋणनिर्देश प्रस्तुत लेखात करावयाचा आहे. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याम धील निरनिराळ्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शालांत परीक्षेत अधिकाधिक गुण मिळण्यास प्रेरणा मिळावी व आपल्याही दिवंगत प्रिय व्यक्तीचे स्मरण रहावे या हेतूने कित्येक हितचिंतकांनी संस्थेकडे कायम स्वरूपी ठेवी ठेवल्या आहेत. या सर्व ठेवीदारांचाही ऋणनिर्देश येथे संक्षिप्तपणे करावयाचा आहे. परंतु एका स्वतंत्र लेखरूपानेही प्रस्तुत देणगीरांच्या देणगी संदर्भातील अहवाल या अंकात समाविष्ट आहे.
शरद आचार्य स्मृतिप्रतिष्ठान सेवा निवृत्तीनंतर श्री. पाटील सर जे शैक्षणिक सामाजिक स्वरूपाचे कार्य, आपली संस्था वगळून ज्या इतर संस्थाच्या माध्यमातून करतात. श्री. काशिनाथ विष्णू दाते यांनी रूपये पन्नास हजार ची देणगी संस्थेस दिली. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. पण सभागृहाचा लाभ घेणाऱ्या कौमुदी परिवारातील प्रत्येकाला ही आठवण ठेवावी लागेल.
श्रीमती लतिका श्याम ठाकूर यांनी आपले स्वर्गीय पती व आमचे पालक श्री. श्याम ठाकूर यांचे स्मरणार्थ काशिनाथ दाते सभागृहाच्या फरशीरूपाने सुशोभनासाठी रूपये पंधरा हजाराची देणगी दिली तेही कुणी विसरू नये.
भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन- या माहूल येथील कंपनीने काही वर्षापूर्वी एक संगणक व वातानुकूलित व्यवस्था यांची देणगी दिली. प्रत्येक वर्षी चेंबूर म धील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना जशी दरवर्षी (८वी पासून महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत – प्रत्येक वर्षी उत्तीर्ण झाल्यास) शिष्यवृत्ती दिली जाते. तशी कुमुदच्याही दोन विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळते त्याबद्दल आणि कुमुद विद्या मंदिरच्या आवारात मोफत होमिओपथिक बहुगुणी वैद्यकीय सेवा केंद्र चालविल्याबद्दल त्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाने भारत पेट्रोलिअमचे हे सामाजिक कार्य वऋण ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
कुमुद विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघ-संस्थेचे विश्वत आणि आमचे माजी विद्यार्थी डॉ. ठाकूर यांनी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची मेहनत पूर्वक आणि संघटन कौशल्याने १९९० साली स्थापना केली. तेव्हापासून गेली १० ते १२ वर्षे कुमुद विद्या मंदिरच्या आजी विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय मार्गदर्शन, निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन, कलचाचण्या असे विविध कार्यक्रम माजी विद्यार्थी संघ आयोजित करीत असतो. तसेच पालकांकरिता मनोरंजनपर कार्यक्रम, माजी विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयीन पुस्तके, सहली यांचेही आयोजन करण्यात येते. आमचे दोन विश्वस्त व माजी विद्यार्थी डॉ. ठाकूर व श्री. कांबळे यांच्या पुढाकाराने, पाटील सरांच्या प्रेरणेने व इतर माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आखले जातात. ही माजी विद्यार्थी संघाची याहून उल्लेखनीय देणगी आहे. कौमुदीन्यास-श्री. पाटील सर काही वर्षापूर्वी जेव्हा सेवा निवृत्त झाले तेव्हा माजी विद्यार्थी संघाने डॉ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील पालक, शिक्षक व नागरिक यांच्या सहाय्याने दीड लाख रूपये निधी संकलित करून श्री पाटील सरांना अर्पण केला. त्या निधीचे विश्वस्त निधीत रूपांतर करून श्री. पाटील सरांनी कौमुदी न्यासची स्थापना केली. श्री विलास कांबळे, सौ. शैलजा टिपणीस, स्वतः श्री पाटील सर, सौ. मीना पाटील व श्री. आचार्य विश्वस्त आहेत. या कौमुदी न्यासाने जून १९९३ मध्ये स्थापना झाल्यापासून संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षकांकरिता तसेच चेंबूरमधील शाळांच्याही शिक्षकांकरिता उद्बोधनपर असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम सादर कले आहेत. कौमुदी न्यासचे उद्दिष्टच मुळी ते आहे.
आमच्या शिक्षकांना या कार्यक्रमांचा, उद्बोधनाचा जो लाभ मिळाला त्याबद्दल कौमुदी न्यासच्या स्थापनेतील पाटील सरांची कल्पकता व शिक्षकांकरिता वैविध्यपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांच्या आयोजनामागील त्यांची तळमळ व कौशल्य याबद्दल शाळेतील शिक्षक त्यांचे सदैव ऋणीच राहतील.
‘स्त्री मुक्ती संघटना’ यांच्या अध्यक्षा व ‘मुलगी झाली हो’ प्रसिद्ध ज्योती म्हापसेकर यांनी शाळेचे आवारात दोन वर्षे गरजू स्त्रियांसाठी सल्ला केंद्र चालविले व पालकांच्या उद्बोधनाकरिता ‘मुलगी झाली हो’ व ‘हुंडा नको ग बाई’ चे मोफत नाट्यप्रवेश सादर केले तसेच ‘जिज्ञासा’ उपयक्रमातून अनेक वर्षे नववीतील मुलांमुलीकरिता उद्बोधन शिबिरे आयोजित केली त्याची आठवण आम्ही ठेवणार आहोत.
श्री बल्लाळ चंद्रचूड शाळेजवळील दत्तगुरू कॉलनीतील एक दानशूर नागरिक श्री बल्लाळ चंद्रचूड यांनी रोटरी क्लब ऑफ देवनारच्या माध्यमातून तसेच स्वतःच्या स्वर्गीय वडीलांच्या स्मरणार्थ रू.१०,०००/- किंमतीचे जलशुद्धीकरण यंत्र शाळेस देणगी दाखल दिले आहे. रोटरी क्लब ऑफ देवनारच्या इतर क्रियाशील सदस्यांनी देखील शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन कलेले आहे.या सर्व उपक्रमांचा शाळेत प्रारंभ करणारे श्री जयंत राजे यांची यावेळी आठवण होते.
इनरव्हील क्लब ऑफ देवनार च्या सदस्यांनी अनेक उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यासाठी डॉ. मृदुला पंडित यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांची, वैद्यकीय सेवेची तसेच सौ. वसुधा चंद्रचूड यांनी मुलांसाठी आयोजित केलेले नेत्रचिकित्सा शिबीर, बालदिनाच्या दिवशी आयोजित केलेली वेषभूषा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिरे यां साऱ्याची नोंद शाळेच्या इतिहासात करावी लागेल. देणगीदार संस्थेला इमारतीकरिता अनेकानी देणग्या दिलेल्या आहेत पण येथे फक्त माध्यमिक विभागाकरिता ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान झाले आहे अशांचा ऋणनिर्देश प्रस्तुत लेखात करावयाचा आहे. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील निरनिराळ्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शालांत परीक्षेत अधिकाधिक गुण मिळण्यास प्रेरणा मिळावी व आपल्याही दिवंगत प्रिय व्यक्तीचे स्मरण रहावे या हेतूने कित्येक हितचिंतकांनी संस्थेकडे कायम स्वरूपी ठेवी ठेवल्या आहेत. या सर्व ठेवीदारांचाही ऋणनिर्देश येथे संक्षिप्तपणे करावयाचा आहे. परंतु एका स्वतंत्र लेखरूपानेही प्रस्तुत देणगीरांच्या देणगी संदर्भातील अहवाल या अंकात समाविष्ट आहे. शरद आचार्य स्मृतिप्रतिष्ठान सेवा निवृत्तीनंतर श्री. पाटील सर जे शैक्षणिक सामाजिक स्वरूपाचे कार्य, आपली संस्था वगळून ज्या इतर संस्थाच्या माध्यमातून करतात.
त्यापैकी शरद आचार्य स्मृतिप्रतिष्ठान ही एक होय. या संस्थेने ज्यात श्री. शरद आचार्य यांचे बंधु, पुत्र व इतर अनुयायी कार्यकर्ते आहेत, श्री पाटील सरांनी सुचविल्याप्रमाणे शाळेच्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर संत ज्ञानेश्वराच्या चैतन्यदायी मूर्तीचे मनोहर दर्शन घडावे म्हणून त्या मूर्तीकरिता व ती ठेवण्याच्या व्यवस्थेकरिता रूपये पंधरा हजाराची देणगी दिली. ती मूर्ती आणि व्यवस्था इतकी विलोभनीय आहे की प्रवेश करता मज्ञानमंदिराचीचफ जाणीव व्हावी. त्याप्रमाणे तळमजल्यावर असलेल्या संस्थेच्या प्रशस्त कार्यालयाकरिता वेगळ्या प्रकारचे पडदे श्री. शशिकांत आचार्य यांच्याकडून संस्थेस देणगी मिळालेले आहेत. अर्थात देणग्या मिळण्याचे श्रेय पाटीलसरांच्या कर्तृत्वाला व कल्पकतेला आहे.
ख) आमचे शिक्षक पद स्वीकारल्यानंतर त्या अंतर्गत जी कामे येतात ती वगळून ज्या विशेष बाबींबात शिक्षकांनी योगदान केले आहे त्याचा उल्लेख ऋण या ठिकाणी व्यक्त करावयाचे आहे. त्यातील पहिली बाब ही संस्थेच्या सदर्भात आहे. १९७५- ७६ या काळात सध्या ज्या जागेवर शाळेची इमारत आहे ती जागा संस्थेच्या नावावर नसल्यामुळे इमारत बांधणीसाठी बँकांकडून जे कर्ज काढावे लागले ते संस्थेच्या नावावर मिळू शकत नव्हते म्हणून संस्थेस सहकार्य करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तुत कर्ज शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नावे घेतल्यास वर उल्लेखिलेल्या सम स्येतून मार्ग निघून कर्जही त्वरित मिळू शकेल असे सुचविले. त्यावेळी पैशाचीही निकड होती व त्वरित मिळण्याचीही गरज होती. त्यावेळेस प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची श्री. पाटीलसरांनी सभा घेऊन कर्ज संस्थाच फेडील अशी हमी देऊन कर्ज स्वत:च्या नावावर घेण्यास संमती देण्याचे आवाहन सर्व शिक्षक शिक्षकेतरांना केले. त्या आवाहनास प्रतिसाद देऊन एकूण तीस शिक्षकांनी त्यास मान्यता दिली व संस्थेस अत्यंत निकडीच्या समयी ताबडतोब व सुलभ रीतीने कर्ज मिळाले. कर्ज वेळेवर फेडले नाही म्हणून बँकेकडून येणाऱ्या नोटीसांचा मानसिक त्रास संबंधित तीस शिक्षकांनी सोसला तो संस्थेवरील, संस्थेच्या कार्यावरील व श्री पाटील सरांवरील निष्ठेतूनच. त्या सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे हे ऋण शाळेच्या/संस्थेच्या इतिहासात नोंदविणे गरजेचें आहे. त्यातील प्राथमि क व माध्यमिक विभागातील काही सर्वांना परिचित अशी नावे पुढीलप्रमाणेः १. सौ. श्रद्धा द्विवेदी – माध्यमिक विभाग- शिक्षक २. सौ. गीता पंडीत – माध्यमिक विभाग- शिक्षक ३. सौ. मीना म. पाटील – माध्यमिक विभाग- शिक्षक ४. श्री मधुसुदन चौलकर माध्यमिक विभाग- शिक्षक – ५. सौ. शांता खुंटे – माध्यमिक विभाग- शिक्षक
६. सौ. प्रिया सावंत – माध्यमिक विभाग- शिक्षक ७. श्री.
सुभाष पाटील माध्यमिक विभाग- शिक्षक ८. श्री. आर. एन. पाटील – माध्यमिक विभाग- शिक्षक ९. सौ. शैलजा टिपणीस – प्राथमिक विभाग – मुख्याध्यापिका १०. श्रीमती माधवी मुगणेकर प्राथमिक विभाग- शिक्षिका ११. सौ. सुनेत्रा साळवी – प्राथमिक विभाग- शिक्षिका १२. सौ. मुग्धा फणसे- प्राथमिक विभाग- शिक्षिका १३. श्री. भिकाजी जिनगरे – माध्यमिक विभाग – कर्मचारी १४. श्री. शरद पाटील सर
१६. सौ. मीना श पाटील
यातील पाच व्यक्ती वगळून सर्वजण शाळेत सध्या कार्यरत आहेत.
ग) सामाजिक बांधिलकीतून सहकाऱ्यांस सहाय्य – शाळेत सध्या कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकांवर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया ऑक्टोबर मध्ये करावयाची होती. शस्त्रक्रिया अत्यंत तातडीची असल्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मदतीवर थांबता येणे शक्य नव्हते अशा वेळी मुख्यांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतरास शासनाकडून मदत मिळेपर्यतच्या अवधीकरिता काही रक्कम कजाऊ देण्यास आवाहन केल्यानंतर केवळ चार पाच दिवसांत सर्वच शिक्षक-शिक्षकेतरांनी स्वेच्छापूर्वक कोणत्याही प्रकारची शंका निर्माण न करता प्रत्येकी रुपये एक हजार ते तीन हजारापर्यंत रक्कम देऊन अल्पावधीत रूपये चौऱ्याऐंशी हजार निधी संकलित केला. आपल्या एका सहकाऱ्यासाठी का होईना एवढी रक्कम मुख्यांच्या केवळ एका आवाहनानुसार तातडीने सर्व शिक्षक-शिक्षकेतरांनी देणे हे शिक्षकांचे ऋणच आहे इतकेच नव्हे तर त्यांनंतर आवश्यक असणाऱ्या निधीकरिता श्री प्रकाश निगळये हे आमचे माजी शिक्षक (फक्त एका वर्षापुरते ) व सध्याचे पालक यांनी रूपये दहा हजार दिले त्यांच्या ऋणाचा येथे उल्लेख करू इच्छितो.

घ) रक्तदान
आणखी एका ऋणाचा निर्देश येथे
करावयाचा आहे. एका शिक्षिकाकरिता (वीस वर्षांच्या सेवेनंतर दहावर्षापूर्वी निवृत्त झालेल्या) शिक्षक शिक्षकेतरांनी तातडीने केलेल्या रक्तदानाचा संबंधित शिक्षिकांचे पती एका गंभीर आजाराने आजारी होते व त्यांना तातडीने उपचार करण्यासाठी रक्त देण्याची गरज होती. मुख्यांना संबंधित शिक्षिकांनी हे कळविल्यानंतर मुख्यांनी सर्व शिक्षक शिक्षेकेतरांना रक्तदानाचे आवाहन केले – चालू शैक्षणिक वर्षातच व केवळ तीन दिवसात मुख्यांनी रक्त उपलब्ध करून दिले त्यासाठी स्वतः मुख्यांसह वीस शिक्षक व शिक्षकेतरांनी आनंदाने रक्तदान केले. शिक्षकांम ध्ये पन्नाशीच्या पुढील शिक्षकांनीही रक्तदान केले. मुख्यांच्या केवळ आवहनानुसार आमच्या शिक्षकांचे हे ऋण मुख्यांवर आहे. त्याची कधीच उतराई होण्याची इच्छा नाही पण कोणत्याही शाळेच्या इतिहासात सहसा घडणार नाही अशा या बाबी आहेत त्या उल्लेखनीय आहेत.
आमचा प्राथमिक व पूर्वप्राथमिक विभाग- आम च्या संस्थेचे जे इतर दोन विभाग आहेत त्यांचेही आम्हास अपेक्षित सहाय्य वेळोवेळी मिळत असते. प्राथमिक विभागाच्या मुख्या. सौ. शैलजा टिपणीस यांच्या संस्थेविषयी असलेल्या तळमळीतून केलेल्या विचार मंथनाचा उपयोग आम्हास झाला आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या दोन प्रमुख सौ. वर्तक व सौ. परचुरे यांचा स्नेहही अनेक कार्यक्रमांतून व्यक्त होतो. दोन्ही विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विशेषतः श्री. हेमंत कदम व सौ. सागवेकर यांची विशेष मदत आम्हास वेळोवेळी होते. या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
आणखी एका महत्त्वाच्या घटकाचे ऋण विसरता येणार नाही आणि तो घटक म्हणजे आमचे पालक. आमच्या सर्व पालकांनी शाळेच्या प्रारंभापासून ते आजतागायत आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली तेव्हा तेव्हा ती त्यांनी दोन्ही हातांनी त्यांच्यापरीने दिली आहे. प्रारंभीचे आमचे पालक मानखुर्द मंडाळा भागातील होते. कुवतीनुसार आर्थिक मदत तर केलीच परंतु एकदा तर मानखुर्द येथे शाळा असताना सर्व म लांकरिता जेवण बनविण्याचेही सहकार्य केले. त्यात वास्तूकरिता श्रमदानही केले.
देवनार येथे शाळा स्थलांतरीत झाल्यानंतर येथील पालकांनीही आम्ही ज्या ज्या योजनांमध्ये त्याचे सहकार्य मागितले त्या त्या वेळी ते त्यांनी दिले मग देश पातळीवरील आपद्गस्तांकरिता असो किंवा लातूर भूकंप पीडितांकरिता सहाय्य निधी असो नाहीतर, स्वातंत्र्यवीर सावरकांवरील चित्रपट निर्मितीकरिता संगीतश्रेष्ठ सुधीर फडके यांनी केलेल्या गीतरामायणाच्या कार्यकमांकरिता तिकीट खरेदी असो. तसेच प्रत्येकवेळी कुवतीप्रमाणे सहकार्य कले आहे. पाटील सरांच्या राज्यपुरस्कारानिमि त्त, सेवापूर्तीनिमित्त किंवा सौ. पाटील बाईच्या पुरस्कारानिमित्त गौरवाकरिता तीन/चार तास उपस्थित राहणे असो की पालक सभेकरिता उपस्थित राहणे असो आमच्या पालकांनी आम्हाला जे विविध प्रकारचे सहकार्य दिले आहे त्याचा आम्हाला अभिमानही आहे, आनंदही होतो. आणि त्यांचे हे जे ऋण आमच्यावर आहेत त्याने आम्ही भारावूनही जातो.
या लेखात उल्लेख केलेल्यांचा ऋणनिर्देश विस्तार भयास्तव संक्षिप्तपणे केला आहे पण एका चांगल्या शाळेची उभारणी करतांना, ती चालवितांना जे असंख्याचे हातभार लागलेले आहेत त्यांच्या ऋणाचा निर्देश कुमुद विद्या मंदिरच्या इतिहासात करायलाच हवा.

सौ. मीना शरद पाटील, मुख्याध्यापिका

Scroll to Top