मे १९६७ कुमुद मेमोरिअल फंड संस्थेची स्थापना झाल्यानंतर १५ ऑगस्ट, १९६७ रोजी कुमुद विद्यामंदिर शाळा सुरु करण्याच्या शक्यतेबद्दल मानखुर्द – ट्रॉम्बे परिसरातील ग्राम स्थांची पहिली सभा आणि ९ जून १९६८ रोजी मानखुर्द येथे अॅटोमिक एनर्जीच्या ताब्यातील पडीक वास्तूमध्ये कुमुद विद्यामंदिर. शाळा सुरु झाल्यानंतर एखाद्या अद्भुत रम्य कथानकासारखा स्थापनेचा हा इतिहास शिक्षण संस्थेच्या बाबतीत आश्चर्यकारक वाटावा असाच आहे.
मानखुर्द – आगरवाडी – मंडाळा – चिकूवाडी ट्रॉम्बे परिसरात एकही हायस्कुल नव्हते साहजिकच शिकण्याची इच्छा बाळगणारी मुले-मुली चेंबूरला जात.
मानखुर्दला शाळा सुरु करण्याच्या विचाराला चालना मिळाली ती दादा सावंतांच्या मुलीला चेंबूरच्या शाळेत प्रवेश मिळाला नव्हता म्हणून दादांनी समोर ठेवलेल्या प्रस्तावामुळेच ! त्यांच्याच बरोबर सर्वत्र हिंडल्यानंतर लक्षात आले की मानखुर्दला एक हायस्कुल हवेच! दादांबरोबर सकाळ-संध्याकाळ अगदी घरा-घरात हिंडून विद्यार्थी संख्येचा आढावा घेऊन शाळेसाठी योग्य जागा शोधण्याची मोहिम हाती घेतली आणि दादांचे लक्ष रामबागेतील ओसाड व काट्याकुट्यांनी भरलेल्या जंगलातील रिकाम्या तबेल्याकडे गेले. अगदी जवळ जाईपर्यंत न दिसणाऱ्या तबेल्यात वाट काढीत काढीत कसे बसे पोहोचलो आणि दादांना सांगून टाकले जागा छान आहे.
जागा अॅटोमिक एनर्जीच्या ताब्यात होती. आताचे अणुशक्तीनगर पलिकडे वसत होते. तत्कालीन डेव्हलपमेंट ऑफिसर श्री. एम. पी. दिक्षितसाहेब यांना भेटून योजना सांगितली. दिक्षितसाहेबांनी प्रथम आम्हाला वेड्यातच काढले पण दुसऱ्याच दिवशी अॅटोमिक एनर्जीचे त्या वेळचे सेक्रेटरी श्री. भक्तवत्सलू साहेब यांच्याकडे आम्हाला घेऊन गेले. भक्तवत्सलू साहेबांनी या अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रस्तावाला आमची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी म्हणा अथवा स्वतःहून नंतर येऊन असमर्थता सांगतील या खात्रीने आम्हाला तोंडी परवानगी दिली. अॅग्रीमेंट वगैरे काही नाही. त्या दिवसापासून परिसर स्वच्छ करण्यास प्रारंभ केला. तेव्हा दादांच्या जनसंपर्काचा साक्षात्कार झाला. बाप्पा समर्थ, सुभाष समर्थ, डॉ. खलप, चुडजी गुरुजी, अंकुश कोळी, भाये, बदलानी, सोमण, देवळेकर, प्रेमजीदादांनी अक्षरशः शेकडो निःस्वार्थी कार्यकर्ते गोळा केले आणि डिसेंबर ६७ मध्ये ग्रामस्थांनी श्रमदान करुन तबेल्या भोवतीचा परिसर एका दिवसात खपून साफ केला. होत्याचे नव्हते झाले. रितसर परवानगी घेऊन व थोड्या फार पैशांची जमवाजमव करुन फेब्रुवारी- मार्चमध्ये तबेल्याचे रुपांतर शाळेच्या इमारतीमध्ये केले. चेंबूरच्या रावते कुटुंबियांनी आर्थिक सहाय्याचा हात पुढे केला. चेंबूरच्या केशवराव करंबेळकरांनी खूपच सवलतीच्या दरात बांधकाम केले व फर्निचर पुरविले. दिक्षितसाहेब व भक्तवत्सलुसाहेब मंत्रमुग्ध होऊन कुमुद विद्यांदिरच्या इमारतीकडे पाहातच राहिले. त्यानंतर काळात या दोघांनीही आमच्या प्रत्येक प्रस्तावाला मान्यता दिली.
९ जून १९६८ रोजी विश्वविख्यात क्रिकेटपटू श्री. विजय मर्चंट यांच्या हस्ते शाळेचे औपचारिक उद्घाटन झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अर्थातच श्री. भक्तवत्सलुसाहेब व सन्मान्य पाहुणे होते. अर्थशास्त्रज्ञ श्री. गोवर्धनदास पारिख शाळेसमोरील शेतातील जागा निमंत्रितांनी फुलून गेली होती. श्री. बाबूभाई द्विवेदी ह्यांनी फारच मोलाचे सहाय्य केले.
पहिल्या वर्षापासूनच अभ्यासाचा दर्जा उच्च राखण्याचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. शालेय वातावरण प्रसन्न ठेवले. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लबाडीला वाव ठेवला नाही. पावतीशिवाय कुणाकडूनही कपर्दिक घेतली नाही. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवला.
फक्त ११ महिन्यांच्या लीव्ह – लायसन्स तत्वावर मिळालेल्या जागेत आम्ही तब्बल ७ वर्षे काढली. कायम स्वरुपाच्या जागेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होतेच.
मंडळा – मानखुर्द येथील शाळेतील
रामबाग-
७ वर्षाचा काळ असंख्य आनंददायक आठवणींनी भरुन राहिला आहे. थंडीच्या दिवसांत आंब्याच्या झाडाखाली भरणारे वर्ग, आंब्याला आंबे लागले की अर्धा वर्ग आंब्याच्या झाडावर, तसेच शाळेजवळील मोठ्या विहिरीमध्ये पोहोण्यासाठी शिक्षकांची नजर चुकवून उतरणारे विद्यार्थी, भातशेती, श्रमदानातून बांधलेले स्वागत केंद्र, उघड्या पडावातून केलेले सागरी सफर, राष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतलेल्या कॅरम टूर्नामेंटस, व्हॉलीबॉल टुर्नामेंटस, कबड्डी सामने, संपूर्ण नाताळच्या सुट्टीत चोवीस तास चालणारी शालान्त परीक्षेची अभ्यास शिबीरे, आंतरराज्य एकात्मता शिबीर, शिबीराच्या निमि त्ताने शाळेत मुक्कामाला येऊन गेलेले राष्ट्रीय नेते, भर मध्यरात्री साजरा केलेला रौप्यमहोत्सवी स्वातंत्रदिन, टी. व्ही. संच प्रथमच खरेदी केल्यानंतर टी. व्ही. वरील कार्यक्रम विशेषतः क्रिकेटची मॅच बघण्याकरिता येणारे गावकरी, श्रावणमासातील शनिवारी/सोमवारी होणारी कीर्तने-प्रवचने, सेवानिवृत्तीनंतरही मे महिन्यासह सर्व दीर्घ सुटीच्या काळात ११ वी इंग्लिशचे भावे सरांचे विनामूल्य वर्ग • एक ना दोन असंख्य सुखद स्मृती ! आज ३० वर्षे उलटून गेल्यानंतरही तेव्हाचे विद्यार्थी एकमेकांना भेटल्यानंतर गप्पांमध्ये तासन्तास रममाण होतात. विसरूच नयेत असे ते दिवस व तो परिसर.
परंतु कायमच्या शालेय इमारतीसाठी मे १९७५ मध्ये तो परिसर सोडून देवनारला स्थलांतर करावेच लागले. नाखुषीने नाइलाजाने, सन १९६८ मध्ये शिशुविहार, १ली, २री, ५वी, ६वी, ८वी व ९ वीचे एकूण ८ वर्ग व ४०० विद्यार्थी संख्येने सुरू झालेली ही शाळा सन १९७५ मध्ये १९ वर्ग व जवळ जवळ १००० विद्यार्थ्यांसह देवनार गावातील श्री. डी. ए. इराणी ह्यांच्या अर्धवट बांधलेल्या इमारतीत स्थलांतरीत झाली. आजची विद्यार्थी संख्या ४००० झाली. सन १९६७ मध्ये आर्थिक कारणांमळे खरेदी न करता आलेला परंतु माध्यमिक शाळेसाठीच राखून ठेवण्यात आलेला, सध्याची भव्य वास्तू उभी असलेला भूखंड श्री. इराणीसाहेबांनी प्रारंभी नामम ात्र रकमेचा हप्ता घेऊन संस्थेच्या ताब्यात दिला. १९७५ पासून सध्याच्या संस्थेच्या मालकीच्या शालागृहाच्या बांधकामास शुभारंभ केला. श्री. इराणीसाहेबांकडून जमीन मिळविण्यासाठी श्री. हरीराम तथा अण्णा म्हात्रे यांनी केलेली मध्यस्थी आम्ही कधीही विसरू शकत नाही. यथावकाश जमिनीच्या किमतीपोटी ठरलेली रक्कम जमीन म ालकाच्या ताब्यात दिली. अण्णांचे आम्ही ऋणी आहोत. पहिली देणगी अण्णांचीच होती.
संस्थेच्या बँक खात्यामध्ये अक्षरशः काहीही शिल्लक नसतांना नवीन पक्या इमारतीच्या बांधकाम स मोठ्या धाडसाने आरंभ केला. एका सहकारी बँककेडून काही लहान दुकानदारांच्या नावे तर शाळेतील काही शिक्षक – सेवकांचे नावे १८ टक्के व्याजाने कर्ज उभारले व बांधकाम चालू ठेवले. इंदिरा सहकारी बँकेडून घेतलेले ४०,०००/- चे कर्ज वेळेवर फेडू न शकल्यामुळे शाळेला सील ठोकण्याची व जप्ती आणण्याची धमकीही सहन केली. इमारत बांधकाम करतांना दिलेली आश्वासने पाळता न आल्यामुळे अक्षरश: तोंड लपवून दिवस काढावे लागले. एका बांधकाम कॉट्रॅक्टरने अबू चव्हाट्यावर टांगली. अशा अनेक कटु आठवणी आजही अंगावर शहारे आणतात. एका राष्ट्रीयीकृत बँकेडून दुसऱ्याच्या नावे घतलेले कर्ज तांत्रिक अडचणींमुळे तत्काळ भरण्याचे आदेश आले व २४ तासात रक्कम परत न केल्यास मपोलिस कोठडीतफ डांबण्याचीही धमकी दिली. या सर्व आठवणी के वळी माहितीसाठी येथे नमूद केल्या आहेत. जवळ काहीही पैसे नसतांना व बाजारात फारशी पत नसतांना सामान्य, इभ्रतदार व प्रामाणिक म ाणसाने शाळा काढण्याचे धाडस करण्यापूर्वी शंभरदा विचार करावा एवढेच विनम्र सांगणे आहे.
साहसे श्रीः प्रतिवसति । शब्दाचा अर्थ धाडस असा आहे तसाच मअविचारफ असाही आहे. फार विचार करणाराचे हातून धाडसी कृत्य होत नाही, असेही पहावयास मिळते. फार विचार न करता अंगीकारिलेल्या सत्कार्यात कोणाचा ना कोणाचा आधार लाभतो याची प्रचीती आली. चेंबूरचे दानशूर शिक्षणप्रेमी व्यावसायिक श्री. दा. कृ. मराठे यांच्या रूपाने आमच्या संस्थेच्या पाठीमागे एक भरभक्कम आधार उभा राहीला. त्यानंतर आम्ही कधी मागे पाहिलेच नाही.
मराठे साहेब – आम्ही तुमचे आजन्म ऋणी राहू! होतीलही बहु-परंतु तुम च्यासारखे तुम्हीच झाले बहु, या काळात अनेक लहान मोठ्या देणग्या मिळत राहिल्या. कुमुद मेमोरिअल फंड संस्थेचे प्रारंभीचे विश्वस्त श्री. पी. एस. नाईक यांच्यामुळे महालक्ष्मी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, केशवजी महिंद्र ट्रस्ट, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट, वाडिया ट्रस्ट यांच्याकडून देणग्या मि ळाल्या. श्री लीलाधरजी डाके यांच्या शब्दांमुळे सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टकडून आणखी देणगी मि ळाली. निरनिराळे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून व स्मरणिका प्रसिद्ध करून निधी उभारला. चालकांनी व परिसरातील नागरिकांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे व विनंतीनुसार लहान मोठ्या देणग्या दिल्या. देवनार म्युनसिपल कॉलनीतील भाई म्हात्रे, सुधाकर महाजन, तेंडुलकर, विश्वनाथ ठाकूर, भगत गुरूजी इत्यादी सुहृदांनी निधी संकलनात मोठेच सहाय्य केले.
जमविलेल्या पै न पै चा चोख हिशेब ठेवला, गैरमार्गाला जराही वाव दिला नाही. आणि यामुळे कुमुद मेमोरिअल फंड संस्थेच्या मालकीच्या विस्तीर्ण भूखंडावर तीन मजली वास्तू सर्व किमान शैक्षणिक व भौतिक सुखसोईनी समृद्ध असून डौलात उभी आहे. आज संस्थेवर कुणाचेही पाच पैशाचे कर्ज नाही. कुणाचे देणे लागत नाही हे अभिमानाने सांगावेसे वाटते. अर्थात याचे सारे श्रेय देणगीदार व पालक- नागरिकांनाच आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सक्षम ङ्गमाजी विद्यार्थी संघफ स्थापन केला आहे. माजी विद्यार्थी संघ सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अनेक समाजोपयोगी काळातही संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सुविद्य व कर्तबगार मा विद्यार्थ्यांचाच सम भावेश करण्यात येईल असेच आमचें धोर आहे.
शाळेचे अनेक माजी विद्यार्थी निरनिराळ्या ज्ञानशाखे प्रावीण्य संपादन करीत आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील आय. ए. एस. पी.एस.आय., प्राध्यापक, पी.एच.डी., कुश तंत्रज्ञ, गॅझेटेड ऑफीसर्स अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये सुय संपादन करून उच्च पदे भूषवित आहेत. शालांत परीक्षेच गुणवत्ता यादीतही आपले विद्यार्थी झळकले आहेत. मानखु देवनार सारख्या तुलनेने अविकसित विभागातील मरा माध्यमाच्याकुमुद विद्यामंदिरमध्ये शालेय शिक्षण घेऊन पुढी जीवनात नेत्रदीपक यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्या आम्हाला रास्त अभिमान आहे. शाळेच्या एकूण शैक्षणिक कार्याचा वृत्तांत इतर प्रकाशित झाला आहे. यास्तव द्विरुक्ती टाळण्यासाठी ये उल्लेख करीत नाही. आपला पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग अत्यंत समर्थपणे कार्यरत आहे. शालेय स्थापनेपासून आजतागायत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक विभागाच्य मुख्याध्यापिका सौ. शैलजा टिपणीस पूर्वीच्याच जोमा किंबहुना त्यापेक्षा अधिक उत्साहाने नवीन नवीन शैक्षणि उपक्रम हाती घेत आहेत व जिद्दीने यशस्वी करून दाखवि आहेत. आरंभापासूनच्या दुसऱ्या शिक्षिका श्रीमती माधव मुगणेकर यांना महापौर पुरस्काराने सन्मानित९
केले आहे. सन २००१ – २००२ मध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेने आपल्य प्राथमिक विभागाला आदर्श शाळा पुरस्कारने सन्मानित के आहे हे मोठया आनंदाने नमूद करीत आहोत. मुंबई महाराष्ट्र ातील निवडक ५० प्राथमिक शाळांच्या सूचीमध्ये कुमु विद्यामंदिर प्राथमिक शाळेला मी पहिला क्रमांक देईन अर गौरवागार मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढत आहेत. शाळेपासून जवळच कुमुद विद्यामंदिर सहकार गृहनिर्माण संस्थेची निर्मिती हे एक स्पृहणीय उदाहरण
आहे केवळ ५,५०,००० रूपयांमध्ये स्वतःच्या मालकीचे रू ७००/- प्रति चौ. फु. चे प्रशस्त घर शिक्षकांना मिळू शकले सारांश, गेल्या ३४ वर्षात कुमुद विद्यामंदिराने विविध क्षेत्रांत यशोमंदिराच्या दिशेने घोडदौड करून विद्यार्थी-पालकः नागरिक शिक्षणाधिकारी यांजकडून शाबासकी मिळविल आहे. प्रगतिपथावरील ही वाटचाल अगदी जवळून पहाण्याचे यशाशक्ती योगदान दिल्याचे मानसिक समाधान मला मिळाले आहे. आणखी काय हवे ?
शरद ना. पाटील
विश्वस्त व माजी मुख्याध्यापक