Kumud Vidya Mandir

कुमुद विद्यामंदिर माजी विद्यार्थीसंघ

माजी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन उज्ज्वल भविष्यासाठी सशक्त बनवणे

कुमुद विद्यामंदिर माजी विद्यार्थीसंघ

कुमुद विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघाची निर्मिती ही संस्थेला व शाळेला भरभरुन आधार देणारी संघटना आहे.
स्व. सुहास विश्वनाथ ठाकूर हयांच्या पुढाकाराने ही संघटना १९९० साली स्थापन झाली व आजपर्यंत अत्यंत उत्साहाने कार्यरत आहे. शाळेचे, समाजाचे व सध्या शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपण काही देणे लागतो ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून यथाशक्ती कार्य करीत राहाणे हे प्रधान उद्दिष्ट आहे.
सहली, विविध स्पर्धांचे आयोजन, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून निरनिराळी समाज हितोपयोगी कामे हाती घेतली जातात.
दरमहा पहिल्या रविवारी सकाळी १० वाजता संघाच्या कार्यकारिणीची सभा होत असते. वार्षिक सर्व साधारण सभा दरवर्षी १५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शाळेत होते.
गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक सहाय्य करणे, विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शनपर, उद्बोधनपर कार्यक्रम घडविणे, सहली, बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करणे. यासारखे उपक्रम वर्षभर सुरु असतात.
डॉ. सुहास ठाकूर हयाच्या आकस्मिक मृत्यूनंतर गेली बारा वर्षे त्याच्या स्मृत्यर्थ डिसेंबरच्या दुसऱ्या रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. माजी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून व नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो. सुहासला ही आदरांजलीच समजली जाते.
आपला माजी विद्यार्थी संघ खरोखरीच अत्यंत अभिमानास्पद आहे.
श्री. चिंतामण गावंड, सुनिल म्हात्रे, राजेश परंडवाल, सुधीर सावंत, राजेंद्र
वाकोडे, हेमा परंडवाल इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन माजी विद्यार्थी संघ नावारुपास आणला. श्री. महादेव कोळी, श्री. विलास कांबळे, श्री. महेंद्र भोईर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली श्री. दयानंद तांबे, श्री. रामचंद्र परुळेकर, श्री. युवराज पवार, श्री. सुदेश पानवलकर , श्री.अविनाश मोरे ,उत्साहाने कार्य पुढे नेत आहेत.
कुमुद मेमोरिअल फंड या संस्थेच्या पायाभरणीचा माजी विद्यार्थीसंघ हा भरभक्कम चिरा 

Members of Association

Alistair Coleman

Principal & Member of B.O.D.

Raelynn Hill

Vice Principal, Sr. Chemistry Teacher

Evelyn Clark

Head Mistress

Creed Hall

Sr. Physics Teacher

Zayn Nelson

Sr. Mathematics Teacher

Capria Adams

Cultural Head

Help us grow the community

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi volutpat justo sed efficitur cursus. Mauris fringilla quam vitae lacinia viverra.

Scroll to Top