- support@kumudvidyamandir.org
- +(91) 1234567890
संस्थापक विश्वस्थ
कुमुद विद्या मंदिरामागे विश्वस्त

संस्थेचे संस्थापक
स्व. श्री. शरद नारायण पाटील
कौमुदी परिवाराचे आधारस्तंभ राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक विद्यार्थीप्रीय आदर्श शिक्षक कर्मयोगी शिक्षण महर्षी अशा आदरणीय सरांना विनम्र अभिवादन !
आदरणीय श्री शरद नारायण पाटील सर, कुमुद मेमोरियल फंडाचे संस्थापक विश्वस्त आणि कुमुद विद्यामंदिर शाळेचे खरेखुरे शिल्पकार आहेत. शाळेच्या स्थापनेपासून सलग 25 वर्षे त्यांनी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पद भूषवले, आणि शाळेच्या प्रत्येक कार्याची पायाभरणी घडवून आणली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे, 1985 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.
साहित्य प्रेमाने ओतप्रोत असलेल्या पाटील सरांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ‘साहित्य मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संवेदनशील मनाचे हे विलक्षण व्यक्तिमत्व शाळा आणि विद्यार्थ्यांना जीवनाचा केंद्रबिंदू मानून, त्यांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेत आहेत. शाळेसाठी त्यांचा ध्यास आणि विद्यार्थ्यांप्रतीचा त्यांचा खास आदर हेच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.
शिक्षणप्रेमी संस्थाचालकांची भूमिका

आदरणीय श्रीमती मीना शरद पाटील
संस्थेचे अध्यक्षा, (राज्य पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका)
कुमुद मेमोरियल फंडाच्या संस्थापक तथा कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्या दुसऱ्या मुख्याध्यापिका म्हणून, त्यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली आणि शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली, सन 2000 साली महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.
कार्यक्रमाचे मायक्रो प्लॅनिंग ही त्यांची खासियत आहे, आणि त्यांच्या तल्लख नियोजन कौशल्यामुळे शाळेच्या प्रत्येक उपक्रमासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. संस्कृत, मराठी, आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे असाधारण प्रभुत्व आहे, ज्यामुळे त्यांनी शाळेत भाषा शिक्षणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मीना पाटील यांचा विद्यार्थी विकासासाठीचा अतूट ध्यास आणि शाळेसाठीचा समर्पणभाव खरोखरच प्रेरणादायी आहे.

श्री. विलास संतू कांबळे
(विश्वस्त) माजी शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई

श्री. महादेव श्रावण कोळी
(विश्वस्त) सिव्हील इंजिनियर, BMC

श्री. आशुतोष शरद पाटील
(विश्वस्त) IBM लोकमत, संपादक

श्रीमती वंदना प्रकाश उतखेडे
( विश्वस्ता ) माजी मुख्याध्यापिका

श्री. महेंद्र महादेव भोईर
निमंत्रित सदस्य, संगणक तज्ञ

श्री. रामचंद्र शशिकांत परूळेकर
निमंत्रित सदस्य, सिव्हील इंजिनियर,
